TRENDING:

Buldhana News : बुलढाण्यात होळीला गालबोट! 2 गटात तुफान राडा; लहान मुलं, महिलाही भिडल्या, Video

Last Updated:

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात होळी उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलडाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : सध्या देशभर होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवसभर धुळवड साजरी केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास होळी पेटवण्याची प्रथा आहे. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. बुलढाणा या जिल्ह्यात उत्सावाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. होळी पेटविण्यावरुन दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
News18
News18
advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाच्या वेळी लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात तुफान राडा झालाय. यात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मात्र, जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविण्यात आल आहे. सध्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहचला असून तणावपूर्ण शांतता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : बुलढाण्यात होळीला गालबोट! 2 गटात तुफान राडा; लहान मुलं, महिलाही भिडल्या, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल