नेमकं काय म्हणाले शिंदे?
मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जालन्यामध्ये जी घटना झाली त्याचं मला देखील दु:ख आहे. मात्र या घटनेची कारणमीमांसा न करताच आरोप केले जात आहेत. ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते तिथे येऊन गेले. आज या विषयावर राजकारण सुरू आहे. मात्र मराठा समाज संयमी आहे. आंदोलनाच्या मागून कोण दगडफेक करत आहे ते पाहावं लागणार आहे. याची माहिती आमच्याकडे येत आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, भक्कम आरक्षण मिळेपर्यंत सरकार आणि मी गप्प बसणार नाही. तो दिवस दूर नाही लवकरच मराठा समाजाला न्याय मिळेल. जालन्यातील लाठीचार्ज दुर्दैवी घटना आहे. जे अधिकारी दोषी असतील त्यांचं निलंबन केलं जाईल, गरज पडल्यास प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
