घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खामगावात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव ते शेगाव रोडवरील विद्युत भांडार समोर घडली आहे. दुचाकीस्वार शौर्य देशमुख वय 14 रा. वाडी व धनंजय चव्हाण वय 15 रा. शामल नगर हे दोघे शेगावकडून दुचाकीने शहरात येत होते. दरम्यान विद्युत भांडार समोर युटर्न घेत असलेल्या टिप्परने दुचाकीला धडक दिली.
advertisement
या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. शौर्य देशमुख याला अकोला येथे पुढील उपचारसाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला तर धनंजय चव्हाण याला शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थाळावरून फरार झाला होता. अपघाताची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
