बुलढाणा, 2 ऑगस्ट : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या विधानाचे आजही विधानसभेत पडसाद उमटले. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भिडे वादात सापडले आहेत. एकीकडे भिडे यांच्याविरोधात आंदोलन होत आहे, तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत आहेत. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा खून करणार असल्याचं माजी मंत्री सुबोध सावजी यांनी जाहीर केलं आहे. सावजी यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
काय म्हणाले माजी मंत्री सुबोध सावजी?
"गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे आपण संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णीचा खून करणार असल्याचं" माजी मंत्री सुबोध सावजी यांनी सांगितलं आहे. "बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेला अटक करून कारवाई करा अन्यथा राज्यातील जनतेच्या वतीने मी भिडेचा खून करेल आणि त्याला गृहमंत्री जबाबदार असतील" असंही पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
भिडे यांच्यावरुन विधानसभेत गोंधळ
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडे यांचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला. मी स्थगन प्रस्ताव दिला होता. भिडे नावावर चर्चा करण्याची मागणी केली होती, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तुम्ही त्या दिवशीही स्थगन प्रस्ताव आणला होता. मी तुम्हाला थोडक्यात म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. शुक्रवारी बोलल्यानंतर परत परत त्याच मुद्द्यावर बोलण्याची गरज नाही, असं सांगितलं. नाना पटोले यांनी नियम 23 वर सूचना दिली आहे. त्यावर मी निर्णय देतो. निर्णय दिल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
वाचा - ...याचा छडा लागला पाहिजे, नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
फडणवीस यांचं निवेदन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर निवेदन करणार असल्याचं सांगितलं. मी निवेदन करतो. संभाजी भिडे यांनी अमरावती येथे भाषण केलं होतं. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले आणि त्यावर कमेंट करायला लावले आहेत. दोन पुस्तके. डॉ. एसके नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत. असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यांनी आपल्या सहकाऱ्या मार्फत उद्धृत केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गुन्हा दाखल करू
कोणत्याही राष्ट्रीय पुरुषाच्या संदर्भात कोणीही अवामानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात हे कार्य चांगलं आहे. पण तरीही त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं विधान करायचा अधिकार दिला नाही. त्यांनाच काय कुणालाही नाही. त्यामुळे महापुरुषावर कुणीही अशा प्रकारे वक्तव्य केलं तर त्यांच्यावर कारवाई होईल. वीर सावकरांवर आक्षेपार्ह लिखाण केलं जात आहे. काँग्रेसचं मुखपत्र शिदोरी या नावाने येतं. त्यात वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. असं लिहिलं जात आहे. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच वीर सावरकरांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या शिदोरीवर ही गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
