खामगाव शेगाव रोडवर एसटीवर पत्रे कोसळले
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर ST बस येत असताना अचानकपणे वादळी वारा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यात वादळी वाऱ्याने चक्क एक लोखंडी टपरी ST बसला धडकली. पाहता पाहता अनेक उडून आलेले टिनपत्रे देखील ST ला मोठ्या प्रमाणात धडकले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी काळजाचा ठोका चुकविणारा विडिओ हा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
टेंभूर्णा येथे स्वागतकमान कोसळली
सोसाट्याच्या वाऱ्याने टेंभुर्णा शिवारातील स्वागत कमान कोसळली. त्यामुळे टेंभुर्णा ते मेहकर रस्ता हा पूर्णपणे जाम झाला असून शासनाकडून दिशा दर्शविणारी ही मोठी कमान आहे. 60 ते 70 फूट उंची वर ही स्वागत कमान लावण्यात आली होती. जर या कमानीच्या खाली कुणी सापडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
वाचा - पुणे, नागपूरनंतर मुंबईत हिट अँड रन! सायन हॉस्पिटलच्या आवारात कारने महिलेला चिरडलं
मलकापूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस
बुलडाणा जिल्ह्यासह मलकापूर शहरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वारा अतिशय वेगाने असल्यामुळे अनेक दुकानांचे पत्र उडून गेले. मलकापूर रेल्वे स्टेशन ते मलकापूर बस स्टॅन्ड पर्यंतच्या रहदारीच्या रोडवरील 15 झाडे पडली आहेत. तसेच अनेक लोकाचे सोलर पॅनल उडाले. चाळीस बिघा परिसरातील मेन रोड वरील 5 झाडे पडली आहे. निमवाडी चौक मधील सर्वात जुने वडाचे झाड पडल्यामुळे 3 दुकानांचे छत पडले आहे. मुख्य रोडवरील मोठ होर्डींग जमीनदोस्त झाल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेला तुफान पाऊस अनेकांना धडकी भरविणारा होता.
