बुलडाण्यात शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. संभाव्य उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांचे नाव चर्चेत होते. पण अचानक आमदार संजय गाकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आमदार गायकवाड अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले असून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिवसेना पक्षाकडून बुलडाण्यात अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्याआधीच शिवसेना आमदार अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत. संजय गायकवाड हे बुलडाणा लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज भरत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांनी अर्ज भरलाय याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 28, 2024 2:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Loksabha Election 2024 : शिंदेंनी यादी जाहीर करण्याआधीच आमदाराने फोडला फटाका, भरला लोकसभेचा अर्ज
