सात वर्षांपूर्वी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा नंतर पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाची हाक बुलढाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा म्हणत एकत्र आले आहेत. यावेळी एका तरुणाने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी उडी मारणाऱ्याला वेळीच पकडले. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.
advertisement
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री आज मनोज जरांगेंच्या भेटीला
बुलढाणा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत मराठ्यांना स्वतंत्र असं आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. या मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व मागील मराठा क्रांती मोर्चा प्रमाणेच मराठा युवतींनी केला आहे. मराठा युवतींच्या एका शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तर मराठा समाजाला स्वतंत्र टीकणार असं आरक्षण देण्याची मागणीही या सकल मराठा समाजाच्या युवतींकडून करण्यात आली आहे.
