याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार संजय गायकवाड यांना कल्याणमधील दुर्गेश बागुल यांनी कॉल केला होता. मराठा आरक्षणाविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर छगन भुजबळांबद्दल असे वक्तव्य का केले अशी विचारणा दुर्गेश यांनी केली होती. तेव्हा दुर्गेश यांच्याशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांचा थेट राजीनामा मागितला. सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाबाहेर जाऊन बोला. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी मागणी संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.
advertisement
संजय गायकवाड यांनी म्हटलं की, राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असं असल्यास तो मंत्री पदावर राहण्यासाठी पात्र नाहीय. भुजबळांमध्ये जातीवाद शिरला असल्यास ते मंत्रिपदावर राहू शकत नाहीत असंही संजय गायकवाड म्हणाले.
