आगीचा भडका उडाला, तेव्हा...
परंतु, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशामक यंत्राचा वापर केला आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली. जेव्हा दुचाकीतून आगीचा भडका उडाला, तेव्हा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या इतर नागरिकांनी भीतीमुळे मिळेल त्या दिशेने धाव घेतली. या घटनेमुळे पेट्रोल पंपावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
कोणतीही जीवितहानी नाही
दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरण्यास असलेली बंदी आणि त्याचे नियम अधिक कठोरपणे पाळण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेकदा ग्राहक आणि कर्मचारी या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात, ज्यामुळे अशा धोकादायक घटना घडण्याची शक्यता वाढते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेने सर्वांनाच मोठा धडा शिकवला आहे.
कोणती काळजी घ्यावी?
पेट्रोल भरताना किंवा पंपाच्या जवळपास असताना मोबाईलवर बोलणे सक्त मनाई आहे. जर तुम्हाला अत्यावश्यक फोन कॉल करायचा असेल, तर पेट्रोल भरण्याच्या ठिकाणापासून सुरक्षित आणि पुरेसे दूर जाऊनच बोला. पेट्रोल पंपाच्या परिसरात प्रवेश करताच आपला मोबाईल फोन पूर्णपणे स्विच ऑफ करा. केवळ स्क्रीन लॉक करणे पुरेसे नाही. परंतू सध्या युपीआयमुळे अनेकदा फोनचा वापर केला जातो. त्यामुळे कॅशचा वापर केलेला कधीही उत्तम. पेट्रोल पंपावर सिगारेट किंवा इतर कोणत्याही प्रकारची आग निर्माण करणारी वस्तू वापरू नका.
