याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेगावमधील फुलेनगर इथं राहणाऱ्या दीपकचे जवळामध्ये राहणाऱ्या वैष्णवीसोबत लग्न झाले होते. मात्र दीपक गजानन हाडोळे याला दारुचे व्यसन होते. त्याची पत्नी ४-५ वर्षांपासून आई सुशीला यांच्याकडे राहत होती. दीपक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास दारू पिऊन सासूच्या घरासमोर आला होता.
जवळा बुद्रुकमध्ये सासूच्या घरासमोर येत दीपकने दरवाजावर लाथा मारल्या. यावेळी मोठ मोठ्याने शिवीगाळही करत होता. त्याने दगड मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पत्नी आणि सासू दरवाजा उघडत नसल्याने दीपक मोठ मोठे दगड दरवाजावर मारत होता.
advertisement
जावई दारात येऊन शिवीगाळ करत दगड मारत असल्याने सासू सुशीला संतापल्या. त्यांनी पाठीमागच्या दरवाजाने बाहेर येत जावयाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू झाला. दीपकची पत्नी वैष्णवी हिने या प्रकरणी आईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
