TRENDING:

Dahihandi : दहीहंडी उत्सवाला गालबोट; गॅलरी कोसळली, 1 मुलगी जागीच ठार, 1 गंभीर

Last Updated:

Dahihandi : देऊळगाव राजा येथे दहीहंडीचा दोर बांधलेली गॅलरी कोसळुन एक मुलगी जागीच ठार झाली तर 1 गंभीर जखमी झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलडाणा, 7 सप्टेंबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : कृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी केली जात आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देशभरात श्रीकृष्णाच्या बाल लीलेने प्रेरित दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सूर्योदय होताच 'गोविंदा आला रे आला'चा गजर गल्लीबोळात ऐकू येतो. बुलढाणा जिल्ह्यातही आज दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, एका घटनेने या सणाला गालबोट लागलं आहे.
दहीहंडीचा दोर बांधलेली गॅलरी कोसळली
दहीहंडीचा दोर बांधलेली गॅलरी कोसळली
advertisement

देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एक चिमुकली जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. 7) रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली.

जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. सदर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा वर चढले होते. दहीहंडी बांधलेल्या दोरला युवक लटकले, त्यावेळी सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण (वय 9 वर्ष) ही चिमुकली जागीच ठार झाली. तर अल्फिया शेख हाफिज (वय 8) तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. प्रथमोपचार नंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले तर मृतक निदा पठाण हिस ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मुंबई-ठाण्यात उत्सव शिगेला

दहीहंडी उत्सवादरम्यान 'गोविंदा' जखमी होण्याची शक्यता लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून BMC रुग्णालयांमध्ये 125 खाटा आगाऊ तयार ठेवल्या आहेत. बीएमसीने सायन रुग्णालयात दहा, केईएम रुग्णालयात सात खाटा, नायर रुग्णालयात चार खाटा आणि शहर आणि उपनगरातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये उर्वरित खाटा तयार केल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यांना इंजेक्शन, औषधे आणि शस्त्रक्रियेचे साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement

वाचा - 'फडणवीस साहेब, तुम्ही देवमाणूस' घाटकोपरमध्ये राम कदमांच्या दहीहंडीत फडणवीसांचे कौतुक करणारे बॅनर्स

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दहीहंडी उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय पक्षांचे नेते मोठ्या दिमाखात सहभागी झाले आहेत. जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यात अनेक दशकांपासून साजऱ्या होणाऱ्या या लोकप्रिय उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मानवी थराच्या उंचीच्या आधारावर हे बक्षीस निश्चित करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Dahihandi : दहीहंडी उत्सवाला गालबोट; गॅलरी कोसळली, 1 मुलगी जागीच ठार, 1 गंभीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल