TRENDING:

विधानसभेसाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; आता थेट मंत्रालयातील सचिवांना उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात?

Last Updated:

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गट मंत्रालयातील सचिवांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बैठकांच सत्र सुरू आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहाता कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला विधानसभेच्या किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
News18
News18
advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जो उमेदवार निवडून येईल त्यालाच शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून  मंत्रालयात सचिव असलेल्या सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय अनुभव असलेल्या सिद्धार्थ खरात यांना जर ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी संधी मिळाली तर या मतदारसंघामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, अंधत्वावर मात करत मिळवली नोकरी
सर्व पहा

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. महायुतीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील हे यश कायम ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे, अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून कशी रणनीती आखली जाणार हे पाहाणं महत्त्वांचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
विधानसभेसाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; आता थेट मंत्रालयातील सचिवांना उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल