14 व्या शतकात मुघलांकडून पालीवाल समाजाचे मूळ असलेल्या राजस्थान येथील पाली गावावर आक्रमण करण्यात आले होते, त्यामध्ये असंख्य पालीवाल समाज बांधव हकनाक मारले गेले होते. त्यामध्ये असंख्य महिला विधवा झाल्या होत्या, अनेक बहिणी आपल्या भावाला मुकल्या होत्या. त्याचाच निषेध म्हणून पालीवाल समाजाकडून रक्षाबंधन हा सण गेल्या शेकडो वर्षांपासून साजरा केला जात नाही. त्याऐवजी पालीवाल समाज एकता दिवस साजरा करून आपल्या पूर्वजांना दरवर्षी श्रद्धांजली वाहत असतो. संपूर्ण भारतभरात पालीवाल समाजाकडून रक्षाबंधन हा सण साजरा केला जात नाही.
advertisement
दरम्यान दुसरीकडे आज देशभरात रक्षाबंधनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बहीण आपल्या लाडक्या भावांना राखी बांधत आहेत. नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आज सर्वत्र रक्षाबंधनाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
August 19, 2024 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Raksha Bandhan 2024: महाराष्ट्रातल्या या गावात कधीच साजरा होत नाही रक्षाबंधन; ग्रामस्थ वाहतात श्रद्धांजली!
