नेमकं काय म्हणाले तुपकर?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज पुण्यात शिस्तपालन समितीची बैठक होत आहे. मात्र या बैठकीला रविकांत तुपकर जाणार नाहीत. रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामधूनच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिस्तपालन समितीची नोटीस येण्यापूर्वीच आपण वरिष्ठांना आपल्याला असलेल्या आक्षेपांबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे शिस्तपालन समितीच्या बैठकीला हजर राहणार नाही, अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. मी जरी या बैठकीला उपस्थित राहणार नसलो तरी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहुनच शेतकऱ्यांसाठी काम करेल असं तुपकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
राजु शेट्टींची प्रतिक्रिया
दरम्यान रविकांत तुपकर यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना राजू शेट्ट यांनी म्हटलं की, तुपकर यांना संघटनेनं संगळं दिलं आहे. त्यांचे संघटनेबाबत जे काही आक्षेप असतील ते त्यांनी मांडावेत. त्यांची जी अडचण आहे, त्यावर आजच्या बैठकीत निर्णय होईल. शिस्तपालन समिती जे सांगेल त्यानुसार निर्णय होईल. तुपकर यांची माझ्याविरोधातच तक्रार आहे. त्यांचा जो आक्षेप आहे, तो त्यांनी शिस्तपालन समितीला सांगितला पाहिजे.
