बुलडाणा : बुलडाण्यातील रुधाना इथं विद्युत खांबाचा शॉक लागून १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. विद्युत खांबात वीजेचा प्रवाह असल्याची माहिती वायरमनला दिली होती. मात्र वायरमनकडून दुर्लक्ष झाल्यानं एका निष्पाप मुलीचा जीव गेला आहे. रुधाना इथल्या कोमल पहुरकर हिचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून गावात शोककळा पसरली आहे.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्युत खांबात वीजेचा प्रवाह असल्याची माहिती वायरमनला कळवण्यात आली होती. मात्र त्याकडे वीज वितरण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. एमएसईबीने विद्युत खांबाची दुरुस्ती वेळेत केली नाही. शेवटी एका १६ वर्षांच्या मुलीचा नाहक बली गेला. कोमल पहुरकर हिचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. तिच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी वंचितकडून करण्यात आलीय.
मुलीच्या मृत्यूमुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून वायरमनवर कारवाई कऱण्याची मागणी केलीय. मुलीच्या परिवाराला तात्काळ ५ लाख रु मदत करा, मुलीच्या परिवारातील एका व्यक्तीला महावितरण कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणुन घ्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवदेन महावितरण कार्यालयाला दिलं आहे. 8 दिवसात मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकु असा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात सापडला महिलेचा शीर, हातपाय कापलेला मृतदेह
खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. तिथून जवळच असणाऱ्या नदी पात्रात महिलेचा शीर आणि हातपाय नसलेला मृतदेह आढळून आला आहे. फक्त धड आढळून आल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. अज्ञात इसमाचा तरुणीला ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
