आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप शिंदे गटाला आहे त्या लोकसभेच्या जागा द्यायला तयार नाही. जर प्रतापराव जाधव यांचा सर्व्हे रिपोर्ट चुकीचा आला असेल तर त्या जागी आमदार संजय गायकवाड हे दंड थोपटून लोकसभेच्या रिंगणात उतरायला तयार असल्याचं स्वतः आमदार गायकवाड म्हणाले आहेत.
वाचा - मुंब्र्यात राजकीय वातावरण तापलं, उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल, जितेंद्र आव्हाडही उपस्थित
advertisement
एकीकडे लोकसभेच्या असलेल्या जागा शिंदे गटाला देण्यास भाजप तयार नाही, तर दुसरीकडे आपल्या जागा भाजपला देणार नाही अशी ठोक भूमिका शिंदे गटाकडून घेतली गेली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शह काटशहाच राजकारण पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणी बुलढाणा लोकसभेचा प्रतापगड सलग तीन टर्म शाबूत ठेवणारे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यांनी या प्रकरणावर मौन बाळगून आपला डाव राखून ठेवला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी लोकसभेत भाजप शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी द्यायला तयार नसेल तर शिंदे गटाकडून आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून शिंदे गटातीलच पदाधिकाऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट केलंय. शिंदे गटाच्या या खेळीमुळे पुन्हा एकदा भाजप बॅकफूटवर जाते का? ते आता पहावं लागेल.
