नेमकं काय म्हणाले गायकवाड?
'सध्या दिवाळी आहे, राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. शेवटी तो परिवार आहे. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असतील. मध्यतंरी अजित पवार आजारी होते, तब्येतीची चौकशी केली असेल. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. अमित शाह यांच्या भेटीचं म्हणत असाल तर एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल म्हणून ते दिल्लीला गेले असतील. काही घडामोडी झाल्या तरी आमचं सरकार स्थिर आहेत. आमच्याकडे 210 आमदार आहेत' अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात आलेली नाहीये. वेगवेगळ्या कार्यालयाची मागणी न करण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच कार्यालयात बसणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर विधिमंडळ परिसरात दोन्ही गटासाठी वेगवेगळ्या कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र दोन्ही गटाकडून अद्याप वेगवेगळ्या कार्यालयाची मागणी करण्यात आलेली नाहीये.
