TRENDING:

'भाऊ सोयाबीनला भाव मिळून द्या' चिमुकल्याचं तुपकरांना भावनिक पत्र, खाऊचे पैसेही दिले मोर्चाला

Last Updated:

सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सध्या रविकांत तुपकर 'एल्गार रथयात्रे'च्या माध्यमातून जिल्हाभर फिरत आहेत. याचवेळी एका चिमुकल्यानं त्यांना भावनिक पत्र लिहीलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा, 13 नोव्हेंबर, राहुल खंडारे : 'मला यंदा दिवाळीला नवीन कपडे व खाऊ नको, आपल्या सोयाबीनला भाव हवा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावासाठी लढणारे रविकांतभाऊ तुपकर यांच्या एल्गार मोर्चासाठी मी हे पैसे देणार आहे. रविकांतभाऊ तुम्ही सरकारच्या धोरणा विरोधात लढा आणि आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या', असे भावनिक पत्र इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या आयुष गोपाल सुरडकर या चिमुकल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लिहिले आहे. नुसतेच पत्र लिहून तो थांबला नाही तर त्याने दोन हजार रुपये त्याच्या वडिलांना रविकांत तुपकर यांना पाठविण्यास भाग पाडले आहे.
News18
News18
advertisement

सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सध्या रविकांत तुपकर 'एल्गार रथयात्रे'च्या माध्यमातून जिल्हाभर फिरत आहेत. मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथे रविकांत तुपकर यांची सभा झाली होती. या सभेला गावातील शेतकऱ्यांसोबत गोपाल सुरडकर हे शेतकरी व त्यांचा इयत्ता चौथीतील मुलगा आयुष देखील उपस्थित होता. या सभेनंतर या चिमुकल्यानं रविकांत तुपकर यांना पत्र लिहीलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एस्थेटिक सिरेमिक कप, 250 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट
सर्व पहा

या पत्रात चिमुकल्यानं म्हटलं की,  'मला यंदा दिवाळीला नवीन कपडे व खाऊ नको, आपल्या सोयाबीनला भाव हवा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावासाठी लढणारे रविकांतभाऊ तुपकर यांच्या एल्गार मोर्चासाठी मी हे पैसे देणार आहे. रविकांतभाऊ तुम्ही सरकारच्या धोरणा विरोधात लढा आणि आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या'

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
'भाऊ सोयाबीनला भाव मिळून द्या' चिमुकल्याचं तुपकरांना भावनिक पत्र, खाऊचे पैसेही दिले मोर्चाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल