घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मालवाहू वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो, असे सांगून चालकाने जखमीला जंगलातील दरीत टाकून दिल्याची घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं अपघातग्रस्त व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील तरुण मन्साराम छत्तरसिंग वासकले वय २२ वर्ष हा एका लग्नानिमित्त भिंगारा येथे गेला होता. मात्र लग्न आटोपल्यानंतर आपल्या दुचाकीने संध्याकाळी गावाकडे परत येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर त्याच्या दुचाकीला मालवाहू गाडीने जोरदार धडक दिली . यामध्ये तो गंभीर जखमी झाला . यावेळी रस्त्यावर थांबलेल्या नागरिकांनी त्या जखमीला त्याच मालवाहू वाहनात टाकून दवाखण्यात न्यायला सांगितले .
advertisement
मात्र वाहनचालकाने पुढे गेल्यानंतर जखमी मन्साराम वासकले याला जंगलातील दरीत फेकून दिले घरच्यांनी शोध घेतला असता आणि पोलिसांत तक्रार दिल्यावर दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह जंगलात आढळला. उपचाराअभावी त्याचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चालकाला अटक केली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
