बुलडाणा जिल्ह्यातील वझर हे गाव उंच टेकडीवर वसलेलं आहे. या गावाला अभयारण्यानं वेढा घातलेला आहे. त्यामुळे नेहमीच जंगली प्राणी या गावात मुक्तसंचार करत असतात. आता तर चक्क वाघ या गावात शिरला आहे, या ठिकाणी वाघाचे ठसे देखील दिसून आले आहेत.
काही कर्मचारी एलबीएस बांधांचे मेजरमेंट करीता गेले असता त्यांना डोंगरावरती वाघाचे ठसे दिसून आले आहेत, एका सामाजिक संस्थेच्या अंतर्गत खामगाव तालुक्यात वॉटर कंजर्वेशन तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कामे चालू आहेत, त्यामध्ये वझर येथे मोठ्या प्रमाणात ई क्लास क्षेत्र आहे तेथे लाखो रुपयांचे कामे संस्थेच्या वतीने चालू आहेत. त्यातील एक टीम मेजरमेंट घेण्यासाठी गेली असता, कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी वाघाच्या पंजाचे ठसे तसेच अस्वलांच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement
