घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या रुग्ण महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत भगत असं या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. प्रशांत भगत याचं खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात कृष्णा होमिओपॅथिक नावानं रुग्णालय आहे, त्याच्याकडे अकोट तालुक्यातून एक महिला उपचारासाठी आली होती.
advertisement
मात्र आरोपी डॉक्टरनं संधीचा फायदा घेऊन या महिलेला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर तिच्यावर त्यानं बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं शुद्धित आल्यानंतर शिवाजी नगर पोलिसांत धाव घेत, आरोपी डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रशांत भगत याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
