पुनर्रचित प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी मिळाल्यानंतर कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या 156 कोटींच्या प्रकल्पात वाढ करून 53 कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेशकुमार आणि सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी उपस्थित राहून ऑनलाईन बैठकीत प्रगतीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व नियोजन अधिकारी भारत वायाळ हे स्थानिक पातळीवर उपस्थित होते.
advertisement
210 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चात अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. मंदिर परिसर बाहेरील प्रशासकीय इमारत, विस्तृत भक्तनिवास,दर्शन लाइन व फंक्शन हॉल, व्यावसायिक संकुल उद्यान, प्रशस्त पार्किंग, महावितरण, एमटीडीसी आणि जलप्राधिकरणाशी संबंधित सुधारणा, पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सुधारणा कामे 13 कोटी तसेच 43 कोटींच्या बायपास रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, ज्यामुळे दररोज येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
2018 पासूनचा प्रकल्प,अखेर वेग आला?
2018 मध्ये कागदावर सुरू झालेला हा प्रकल्प अनेक कारणांमुळे विलंबला होता. मात्र जानेवारी 2025 पासून प्रत्यक्ष कामांना गती मिळाल्याने भाविक व स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
