नाशिकच्या कॅनडा चौकाच्या या नावाचा इतिहास सुमारे 120 वर्षे जुना आहे. 1904 च्या सुमारास नाशिक नगरपालिकेच्या एका सदस्याने 'झेना बायबल मेडिकल मिशन'च्या प्रमुख डॉ. मिस आर. हारवे यांना एक प्रस्ताव दिला. शरणपूर भागात सुरू असलेले 'धुनकरबाई हॉस्पिटल' 10 वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवण्यास घेण्याबाबत हा करार होता. यामुळे मिशनला हक्काची जागा मिळाली आणि हॉस्पिटलला प्रशिक्षित डॉक्टरांचा ताफा लाभला. मात्र 1914 मध्ये हा करार संपल्यानंतर धुनकरबाई हॉस्पिटल पंचवटीत स्थलांतरित झाले. ही रिक्त झालेली जागा आणि जुनी इमारत झेना मिशनने विकत घेतली. याच काळात येथे हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यात आली.
advertisement
कॅनडाशी काय आहे कनेक्शन?
या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आणि विस्तारासाठी कॅनडातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता. ज्या दातृत्वामुळे हे रुग्णालय उभे राहिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी याला 'कॅनडा हॉस्पिटल' असे नाव देण्यात आले. हळूहळू या रुग्णालयामुळे परिसराची ओळख 'कॅनडा कॉर्नर' म्हणून रूढ झाली. नाशिकमध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. त्यावेळी सिव्हिल आणि हॅरिस हॉस्पिटलसोबतच या 'कॅनडा हॉस्पिटल'ने नाशिककरांना वाचवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती.
आज कुठे आहे हॉस्पिटल?
काळाच्या ओघात आज ते हॉस्पिटल अस्तित्वात नाही, मात्र त्याच्या आठवणी या चौकाच्या रूपाने आजही जिवंत आहेत. जुन्या कॅनडा हॉस्पिटलची इमारत आजही बीएसएनएल कार्यालयाच्या पाठीमागे आहे.
अशोक खरातवर कुणाची छत्रछाया?
नाशिकच्या हायप्रोफाईल बाबाचे राज्यात आणि इतर राज्यात असंख्य ‘भक्त’ असून त्याच्याविरोधात पूर्वी गंभीर स्वरुपाच्या तक्रारी राज्यातील पोलीस ठाण्यांत होत्या. मात्र, त्याच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, नाशिक शहर पोलिस आयुक्तांनी खरातचा ‘खरा’ चेहरा जगासमोर आणून नाशिकच्या बालेकिल्ल्यातून जबरदस्त मास्ट्ररस्ट्रोक दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर नेमकी कुणाची छत्रछाया आहे? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
