TRENDING:

Maruti Grand Vitara धडकली आणि आग लागली, काही सेंकदात महिलेचा जळून कोळसा, जळगावमधील घटना

Last Updated:

कारला अचानक आग लागल्यामुळे स्थानिकांनी धाव घेतली आणि चालकाला काच फोडून बाहेर काढलं, परंतु, कारला आग लागली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इम्तियाज अली, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जामनेर : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये जळगाव -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कारचं टायर फुटल्यामुळे अपघात झाला. या अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या आगीच एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आणि शेवटी राख झाली.

मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाकोदजवळ पिंपळगाव फाटा इथं ही घटना घडली. Maruti Suzuki Grand Vitara ही SUV संभाजीनगरच्या दिशेनं जात होती. पण अचानक पिंपळगाव फाट्याजवळ कारचं टायर फुटलं आणि कार अनियंत्रित होऊन कार रस्त्याच्या कडेला धडकली. कारने जेव्हा धडक दिली तेव्हा अचानक पेट घेतला. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

advertisement

कारला अचानक आग लागल्यामुळे स्थानिकांनी धाव घेतली आणि चालकाला काच फोडून बाहेर काढलं, परंतु, कारला आग लागली आणि धुरामुळे महिला दिसली नाही चालकाला बाजूला नेल्यानंतर त्यांनी सांगितलं गाडीत माझ्या सोबत महिला पण आहे. लोकांनी कारकडे धाव घेतली, तोपर्यंत कारने मोठ्या प्रमाणात पेट घेतला, त्यामुळे महिलेला कारमधून निघण्याची संधीच मिळाली नाही. या महिलेचा कारमध्ये होरपळून मृत्यू  आणि शेवटी राख झाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते विशाल जोशी यांच्यासह पहुर पोलीस, महामार्ग पोलीस,आर टी ओ,वाकोद पोलीस पाटील ग्रामस्थ मदत करीत होते. वाकोद येथील पाण्याचा टँकर मागवून कार विझवली. त्यानंतर काही वेळात जामनेर येथील अग्निशमन दलाची गाडी आणि कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत कारमधील मधली महिला पूर्णपणे जळून खाक झाली होती. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maruti Grand Vitara धडकली आणि आग लागली, काही सेंकदात महिलेचा जळून कोळसा, जळगावमधील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल