TRENDING:

कॉल सेंटर म्हणून आत भलतेच उद्योग, सीबीआयकडून भांडाफोड, नाशिक-कल्याणमध्ये मोठी कारवाई

Last Updated:

CBI: सीबीआयच्या कारवाईनंतर राज्यातील इतर भागांतील अशा बेकायदेशीर कॉल सेंटरवरही कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्रात सीबीआयने मोठी कारवाई करत नाशिक आणि कल्याण येथील बेकायदेशीर कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकमध्ये सीबीआयची कारवाई
नाशिकमध्ये सीबीआयची कारवाई
advertisement

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर विमा एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते. लोकांकडून लाखो रुपयांची लूट केली जात होती. या गैरप्रकारासाठी तब्बल ६० जणांना कामावर ठेवण्यात आले होते. प्रत्येकाला ठराविक पद्धतीने नागरिकांना पटवून फसवणुकीत गुंतवण्यात आले होते.

कारवाईदरम्यान सीबीआयला मोठ्या प्रमाणावर पुरावे हाती लागले आहेत. यात तब्बल ५ लाख रुपये रोख, मोबाईल हँडसेट्स, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व उपकरणांमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

advertisement

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी लोकांचा यात सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणारे कॉल सेंटर स्थानिक स्तरावर सुरू होते, मात्र पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॉल सेंटर म्हणून आत भलतेच उद्योग, सीबीआयकडून भांडाफोड, नाशिक-कल्याणमध्ये मोठी कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल