उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून जिल्हाप्रमुख पदावरील राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संचालक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. एकूण २१ संचालक असलेल्या या बँकेत भाजपच्या बाजूने १७ संचालक असल्याचे स्पष्ट झाले.
बंटी भांगडिया किंगमेकर, बँक खेचून आणली
नऊ संचालक पदांसाठी 10 जुलै रोजी निवडणूक पार पडली होती. तर 12 संचालक बिनविरोध निवडून आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी २२ जुलैला आपण बँक भाजपच्या वर्चस्वाखाली आणत त्यांना गिफ्ट देऊ अशी घोषणा फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार बंटी भांगडिया यांनी आधीच केली होती. त्यानुसार किंगमेकर भूमिका बजावत त्यांनी ही बँक खेचून आणली. सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण बँक आणि बँक योजना राबवू, अशी ग्वाही सत्तापक्षाने दिली आहे.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी आम्ही त्यांना भेट दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक लढलो. निवडणूक काळात आम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे मार्गदर्शन होतेच. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला निवडणूक जिंकण्यात यश आले. चंद्रपूर बँकेची निवडणूक जिंकून देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी आम्ही त्यांना भेट दिली आहे, असे बंटी भांगडिया म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू, नवनिर्वाचित अध्यक्षांची ग्वाही
चंद्रपूर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू. इथून मागे संचालक म्हणून आम्ही होत असलेल्या चुकीच्या गोष्टी सगळ्यांसमोर आणल्या. आताही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र शिंदे म्हणाले.