रवींद्र शिंदे यांच्या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेवर पुन्हा सत्ता मिळवण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला आहे. रवींद्र शिंदे यांना भाजप प्रवेशाची ऑफर होती. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांना संपर्क साधला होता. पुढील राजकीय कारकीर्दीचा गांभीर्याने विचार करून शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी वासुदेव ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजय देवतळे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश सोहळा झाला.
advertisement
चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष घंटे यांनी यांनी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेवर काँग्रेसचाच अध्यक्ष बसेल, असा दावा केला होता. २१ संचालकांपैकी काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थित १२ संचालक निवडून आले आहेत. काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे अशा सगळ्यांच्या उपस्थितीत लवकरच सर्व संचालकांसोबत बैठक घेऊन बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावे अंतिम केली जातील, अशी चर्चा झाली.
काँग्रेसच्या स्वप्नांचा चुराडा
परंतु मंगळवारी झालेल्या राजकीय भूकंपामुळे काँग्रेसच्या स्वप्नांचा चुराडा झाला. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.