चंद्रपूर : वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वन सर्वेक्षण विभागाने 2023 ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली. त्यात देशात एकूण भूभागाच्या 25.17 टक्के क्षेत्रात जंगल आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 16.94 टक्के आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 35.21 टक्के वनक्षेत्र असल्याचे म्हटले आहे.
advertisement
2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 35.40 टक्के जंगल होते, तर 2023 च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 35.81 टक्क्यांवर आले आहे. 2021 मध्ये घनदाट जंगल 1320.89 वर्ग किमी होते. 2023 मध्ये ते कमी होऊन 1318.87 वर्ग किमी झाले.2021 मध्ये मध्यम घनदाट जंगल 1555.39 वर्ग किमी होते. ते घटून २2023 मध्ये 1521. 60 वर्ग किमी झाले. 2021 मध्ये उघडे वन क्षेत्र 1173.93 वर्ग किमी होते. ते वाढून 2021 मध्ये 1189.81 वर्ग किमी झाले झुडपी जंगलात मात्र अल्पशी वाढ झाली आहे.2021 मध्ये 43.67 होते. हे प्रमाण वाढून 2023 मध्ये 44.06 टक्के झाले.
जंगलाचे प्रमाण कमी होण्याचे कारण
पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे म्हणाले, दोन वर्षापूर्वी फॉरेस्ट ऑफ इंडियाचा जो सर्व्हे झाला. यामध्ये आपलं जंगल 35.40 टक्के होते. परंतु 2023 च्या सर्व्हेनुसार जंगल 35.21 टक्के झाले आहे. जवळपास 0.20 टक्के घट झालेली पाहायला मिळते. यामध्ये घनदाट जंगलात देखील घट झालेली पाहायला मिळते. उघड्या वनाचे (ओपन फॉरेस्ट) चे प्रमाण वाढलेले पाहायला मिळते. जंगलाचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. जंगलाचे प्रमाण कमी होणे हे धोक्याची घंटा आहे. विकासकामांसाठी जंगलाची तोड केली जाते त्यामुळे जंगल कमी होतात. शेतीसाठी, जंगलावरचे अतिक्रमण अशा कारणांमुळे जंगलाचे प्रमाण कमी होते.
वनक्षेत्र कमी होणे चिंतेची बाब
देशात वन क्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपूर वनांचा जिल्हा असतानाही चंद्रपूरचे वन क्षेत्र कमी कसे झाले, असा प्रश्न निर्माण झालाय. आधीच इथे वाघ-मानव संघर्ष वाढलेला असताना ,भ्रमण मार्ग तुटले असताना वनक्षेत्र कमी होणे, ही चिंतेची बाब ठरली आहे.