घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनानंतर 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ- उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या नागरिकांना या परिसरात असलेल्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
advertisement
एकाचा मृत्यू
दरम्यान या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असं या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाच वेळेस शंभर जणांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे.