मुळचा राजस्थानच्या असलेला मयत व्यक्तीचे नाव राजेश नारायणलाल मेधवानी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेशच्या पत्नीने त्याला सोडून काही महिन्यांपूर्वी चंद्रप्रकाश मेघवंशी नावाच्या व्यक्तीशी विवाह केला होता. हे दोघे हरदोणा येथे राहत होते. आपल्या पूर्वपत्नीला भेटण्यासाठी राजेश मेधवानी शुक्रवारी हरदोणा येथे आला. मात्र, ही भेट काही चांगली ठरली नाही. या भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि काही क्षणातच तो इतका वाढला की, चंद्रप्रकाशने धारदार तलवारीने राजेशची हत्या केली. चंद्रप्रकाशला देखील काहीच सुधरलं नाही.
advertisement
धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरातील लोकांनी तातडीने पोलिसांना (Police) माहिती दिली. या गंभीर घटनेनंतर राजुरा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि अवघ्या दीड तासाच्या आतच गुन्हेगाराला ताब्यात घेतले, परंतु या घटनेमागील सत्य काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
घटनेनंतर आरोपी मेघवंशी मला तर काही माहितच नाही अशा आविर्भावात वावरत होते. घरमालकाने याची माहिती राजुरा पोलिसांना दिली. राजुराचे ठाणेदार सुमित परतेकी यांनी आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळ गाठलं तेव्हा त्यांना घटनाक्रम समजला नाही.. सुरुवातीला कुणीतरी मारून पसार झाल्याचे सांगितले जात होतं. मात्र, ठाणेदार परतेकी यांना एका व्यक्तीचा जबाब घेताना त्याच्यावर संशय आला. या संशयाच्या आधारावर त्यांनी चंद्रप्रकाश मेघवंशी याला ताब्यात घेतलं, अशी माहिती ठाणेदार परतेकी यांनी दिली.
दरम्यान, पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत. पोलिसांनी फक्त 90 मिनिटात तपास केला अन् आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
