TRENDING:

Chandrapur : ट्रकची स्कुटीला धडक, शाळेत निघालेल्या शिक्षिकेचा रस्त्यातच दुर्दैवी अंत; घटना सीसीटीव्हीत कैद

Last Updated:

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अनिता किशोर ठाकरे या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हैदर शेख, चंद्रपूर, 04 सप्टेंबर : चंद्रपूरमध्ये ट्रकला धडकून दुचाकीवरील महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत ककैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रकला धडकताच शिक्षिका रस्त्यावर पडली आणि ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अनिता किशोर ठाकरे या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. अनिता ठाकरे या श्रीकृपा कॉलनीन, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर इथे राहत होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या लखमापूर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शाळेत जात असताना हा अपघात घडला.

advertisement

Baramati : शाळेला निघाले होते विद्यार्थी, भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

अनिता या चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ आल्या असताना भरधाव वेगात मागून येणाऱ्या ट्रकची त्यांना धडक बसली.   या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक बसल्यानंतर स्कूटी एका बाजूला पडली तर अनिता या रस्त्यावर पडल्या. ट्रकची चाके त्यांच्या अंगावरून गेली आणि त्या गतप्राण झाल्या. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Chandrapur : ट्रकची स्कुटीला धडक, शाळेत निघालेल्या शिक्षिकेचा रस्त्यातच दुर्दैवी अंत; घटना सीसीटीव्हीत कैद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल