TRENDING:

‘मला कराल खासदार तर गावागावात उघडणार बिअर बार’ महिला उमेदवाराची ॲाफर व्हायरल

Last Updated:

वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत दारू बियर व मद्य याविषयीची आपली आश्वासने लोकांपुढे ठेवली होती. मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हैदर शेख, चंद्रपूर : लोकसभेचा प्रचाराला धडाक्यात सुरुवात झाली असून उमेदवारांकडून मतदारांना आश्वासनांची खैरात केली जात आहे. पण यामध्ये सध्या चद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची चर्चा रंगली आहे. दिवाळीला सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जातो. यात साखर, तेल चनाडाळ, मैदा इत्यादी वस्तू असतात. या सोबत व्हिस्की आणि बिअर देईन असं आश्वासन महिला उमेदवार वनिता राऊत यांनी म्हटलं आहे.
News18
News18
advertisement

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या या आहेत वनिता राऊत. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या रणात उरलेल्या 15 उमेदवारांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास आपल्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधासह दारू व बियरची विक्री करण्याचं आश्वासन दिलंय. यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्या ठाम आहेत.

advertisement

याआधी वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत दारू बियर व मद्य याविषयीची आपली आश्वासने लोकांपुढे ठेवली होती. मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. देशाचे भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक. देशाशी निगडित जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर उमेदवार सभा- मैदान गाजवत असतात. मात्र वनिता राऊत यांच्या या आश्वासनाची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगली चर्चा होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
‘मला कराल खासदार तर गावागावात उघडणार बिअर बार’ महिला उमेदवाराची ॲाफर व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल