ईशाचे आई-वडील दोन्ही होमियोपॅथी डॉक्टर असून ब्रम्हपुरी शहरात त्यांचा दवाखाना आहे. पुलावरून जाणाऱ्या अनेक लोकांनी ही घटना मोबाईल मध्ये शूट केली. याचे व्हिडीओ वायरल झाले आहेत. ईशा एमबीबीएस असून तिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वैनगंगा नदीन आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. पहिल्यांदा उडी मारली तेव्हा पाणी कमी असल्याने ती वाचली. मात्र, त्यानंतर पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेत जीवन संपवलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
ईशा स्कुटीने वैनगंगा नदीच्या वडसा इथं असलेल्या पुलावर आली होती. त्यानंतर दुचाकी उभी करून चपला काढल्या आणि नदीत उडी मारली. पात्रात पाणी कमी असल्यानं ती वाचली. पण नंतर ती जास्त पाणी असलेल्या ठिकाणी गेली. तिचा यावेळी व्हिडीओही अनेकांनी काढला. मात्र वाचवण्यासाठी कुणीही गेलं नाही. वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रात तिचा मृतदेह आढळून आला.