शहरातील इंदिरानगर भागातील सहारे यांच्या घरात 4 तास शोध अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान चालू केले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही तरुण येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात एक तलवार, 1 मॅक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत.
advertisement
सहारे यांच्यासह शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. विक्रांत सहारे हे शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्या घरातून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.