याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवा वझरकर याचा अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर या मित्राच्या कार्यालयाजवळ मृतदेह आढळला. मृतक आणि 3 आरोपी यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक कारणावरून धुसफूस सुरू होती. त्यावरून शिवा याला भेटायला बोलावून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर शिवा समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला. हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या उबाठा गटाच्या 3 कार्यकर्त्याना पोलिसांनी रात्रीच अटक केली.
advertisement
शिवा वझरकरची हत्या झाल्याचं समजताच त्याच्या समर्थकांनी संशयित आरोपीचे जेसीबी आणि वाहनांची मोडतोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकरचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला आहे.