TRENDING:

सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच राहिलं! 2 महिन्यांपूर्वीच लग्न, रस्त्यातच संभाजीनगरच्या त्या तरुणाला मृत्यूनं गाठलं

Last Updated:

आयुष्याच्या नव्या स्वप्नांना पंख फुटत असतानाच नियतीने घाला घातला. भरधाव छोट्या हायवाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : संसाराची सुरुवात करून अवघे दोनच महिने झाले होते. आयुष्याच्या नव्या स्वप्नांना पंख फुटत असतानाच नियतीने घाला घातला. भरधाव छोट्या हायवाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (28 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजेच्या सुमारास धानोरा फाट्यालगत घडली.
‎दोन महिन्यांपूर्वी लग्न… आणि नियतीचा क्रूर घाव; अपघातात तरुणाचा मृत्यू, आई गंभी
‎दोन महिन्यांपूर्वी लग्न… आणि नियतीचा क्रूर घाव; अपघातात तरुणाचा मृत्यू, आई गंभी
advertisement

‎कन्नड तालुक्यातील आडगाव भोसले येथील अमोल भोसले हे आई गीताबाई भोसले यांच्यासोबत धार्मिक कार्यासाठी भोकरदन येथे जात होते. दुचाकी (एमएच 20 ईबी 0943) वरून ते सिल्लोडकडे येत असताना छोटा हायवा (एमएच 20 जीझेड 4928) चालकाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमोल भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर गीताबाई भोसले गंभीर जखमी झाल्या.

advertisement

एक प्लेट डाळ-भात पडलं 98 हजाराला; जेवण ऑर्डर केलं पण तोंडचं पाणी पळालं, मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?

जखमी गीताबाई यांना तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. अमोल यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

‎दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेले अमोल भोसले हे आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते. गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत ते नेहमी पुढाकार घेत असत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच आलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी आडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच राहिलं! 2 महिन्यांपूर्वीच लग्न, रस्त्यातच संभाजीनगरच्या त्या तरुणाला मृत्यूनं गाठलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल