advertisement

प्रेमाचं जाळं, धर्म बदलून 'निकाह' अन् मग पत्नीला परपुरुषांच्या हवाली केलं अन्..; छ. संभाजीनगरमधील तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी

Last Updated:

एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं धर्मांतर करण्यात आलं. यानंतर चक्क स्वतःच्या पतीनेच तिला इतरांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

धर्मांतरण करून निकाह अन् भयानक घडलं (प्रतिकात्मक फोटो)
धर्मांतरण करून निकाह अन् भयानक घडलं (प्रतिकात्मक फोटो)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं धर्मांतर करण्यात आलं. यानंतर चक्क स्वतःच्या पतीनेच तिला इतरांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत या नराधमांचा काळजाचा थरकाप उडवणारा पाशवी चेहरा जगासमोर आणला आहे.
मैत्री, धर्मांतर आणि मग नरकयातना
पीडितेच्या फिर्यादीनुसार, आरोपी पतीने सुरुवातीला गोड बोलून मैत्री केली आणि नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचे धर्मांतर करून मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावले. मात्र, लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यातच पतीचा खरा चेहरा समोर आला. त्याने अनेक परक्या पुरुषांना घरी आणून पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. यापूर्वीही पीडितेने छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल केले होते, मात्र आरोपीच्या जाचातून तिची सुटका झाली नाही.
advertisement
परभणीत सामूहिक बलात्कार अन् चाकूने हल्ला
२०२४ मध्ये आईच्या मृत्यूनंतर आरोपीने पुन्हा पीडितेशी जवळीक साधली आणि तिला परभणीला नेले. तिथे दिराने तिची छेड काढली आणि तक्रार केल्यावर सासू-सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली. ७ जानेवारी २०२६ आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये परभणीतील घरातच ४ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. "परभणी आमची आहे, आता तुला मजा येते का?" असे म्हणत नराधमांनी तिच्या मांडीवर चाकूने वार करून तिला रक्तबंबाळ केले. या भीषण छळात एका मौलानानेही तिची छेड काढल्याचा आरोप तिने केला आहे.
advertisement
घरात शिरून मारहाण अन् सोन्याची चोरी
२० फेब्रुवारी रोजी आरोपी पतीने छत्रपती संभाजीनगरमधील घरात शिरून पीडितेला आणि तिच्या चिमुकल्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जाताना त्याने घरातील ५ ते ६ तोळे सोने आणि वडिलांची मोपेडही चोरून नेली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने ११२ वर कॉल केला आणि पोलिसांकडे न्याय मागितला.
१० जणांविरुद्ध गुन्हा
नानलपेठ पोलिसांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बलात्कार (६४-१), सामूहिक बलात्कार (७०-१), अश्लील चित्रफित दाखवणे (७५-२), जीवे मारण्याची धमकी आणि तीक्ष्ण हत्याराने मारहाण अशा गंभीर कलमांचा समावेश आहे. एकूण १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्रेमाचं जाळं, धर्म बदलून 'निकाह' अन् मग पत्नीला परपुरुषांच्या हवाली केलं अन्..; छ. संभाजीनगरमधील तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement