advertisement

SL vs PAK : इकडं कॅप्टनने जाहीर माफी मागितली, तिकडं श्रीलंकेला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या जयसूर्याचा काळजावर दगड ठेऊन मोठा निर्णय!

Last Updated:

Pakistan vs Sri lanka : श्रीलंकेला पुन्हा सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या हेड कोच सनथ जयसूर्या याने मोठा निर्णय घेतला असून तो आता हेड कोच पदावरून निवृत्त होत आहे.

Sri Lanka captain apologized As Sanath Jayasuriya
Sri Lanka captain apologized As Sanath Jayasuriya
Sri Lanka captain apologized : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. काल या दोन्ही संघात सामना खेळवला गेला. पण दोघांच्या पदरी निराशा आली. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचता आलं नाही तर दुसरीकडे श्रीलंकेला मॅच जिंकला आली नाही. श्रीलंकेसाठी हा पराभव जिव्हारी लागल्याचं पहायला मिळालं. श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाका याने तर मॅच झाल्यावर श्रीलंकेच्या फॅन्सची जाहीर माफी मागितली तर श्रीलंकेला दुसरा धक्का बसला आहे.

दासून शनाका भावूक 

श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाका याने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना भावूक झाला अन् पहिल्यांदा त्याने प्रेक्षकांची माफी मागितली. ही स्पर्धा आमच्यासाठी खूप कठीण राहिली आणि आम्ही चाहत्यांना निराश केले आहे. शाहीन आफ्रिदीने टाकलेली शेवटची ओव्हर निर्णायक ठरली आणि दुर्दैवाने मी मॅच फिनिश करू शकलो नाही, असं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली. मी श्रीलंकन फॅन्सला निराश केलं, याचं मला दु:ख होतंय, असंही दासून शनाका म्हणाला.
advertisement

हेड कोच पदावरून निवृत्त

तर दुसरीकडे श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेला पुन्हा सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या हेड कोच सनथ जयसूर्या याने मोठा निर्णय घेतला असून तो आता हेड कोच पदावरून निवृत्त होत आहे. त्याचा कार्यकाळ संपायला अजूनही काही वेळ शिल्लक आहे. पण जर माझ्या जागेवर कुणी दुसरा येण्यास तयार असेल तर मला मोकळं करा, असं जयसूर्या याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कळवलं आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
advertisement

31 बॉलमध्ये 76 धावांची खेळी

दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने 31 बॉलमध्ये 76 धावांच्या खेळीमुळे एका हरलेल्या सामन्यात श्रीलंकेला जवळपास विजय मिळवून दिला होता. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी 28 धावांची गरज होती. शनाकाने पहिल्या 4 चेंडूंवर 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 22 धावा केल्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SL vs PAK : इकडं कॅप्टनने जाहीर माफी मागितली, तिकडं श्रीलंकेला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या जयसूर्याचा काळजावर दगड ठेऊन मोठा निर्णय!
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement