TRENDING:

Ashok Kharat Case : अटकेच्या 72 तास आधी सिक्रेट मिटिंग! शिर्डीच्या हॉटेलमध्ये अशोक खरातला भेटलेले तीन IAS अधिकारी कोण?

Last Updated:

Shirdi Ashok Kharat Secrete Meeting With IAS officers : अशोक खरात याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्यातील तीन बडे आयएएस अधिकारी उपस्थित होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shirdi Ashok Kharat News (हरिष डिमोटे, प्रतिनिधी) : नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेनंतर नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असून आता अनेक राजकीय नेत्यांचे फोटो देखील समोर येत आहेत. अशातच खरातच्या अटकेच्या अवघ्या 3 दिवस आधी शिर्डीत एक गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून या प्रकरणाने आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Ashok Kharat Secrete Meeting With IAS officers In Shirdi hotel
Ashok Kharat Secrete Meeting With IAS officers In Shirdi hotel
advertisement

शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये बैठक

भोंदू अशोक खरात याला अटक होण्याच्या 72 तास आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्यातील तीन बडे आयएएस अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. ही बैठक घडवून आणण्यात 'विनोद' नावाच्या एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.

advertisement

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले? खरा मास्टरमाईंड कोण? प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट!

विनोद आहे तरी कोण?

अशोक खरातची आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक सेट करणारा हा विनोद आहे तरी कोण? असा सवाल विचारला जात आहे. विनोद हा खरातचा शिर्डी परिसरातील अत्यंत जवळचा 'पंटर' असल्याचं समजतंय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. आता या तीन आयएएस अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

advertisement

अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचारांचा व्हिडीओ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

दरम्यान, अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. इंटरनेट आणि केबल जोडण्याच्या उपकरणांच्या सहाय्याने एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या अघोरी उपचारांचा व्हिडीओ समोर आल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, खरात आपल्या कार्यालयात एका महिलेच्या समोर तिच्या अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करण्यास सांगतो. त्या मुलीच्या पोटावर स्पर्श करत अघोरी उपचार करत असल्याचे भासवतो. भोंदूगिरी करण्याचा प्रकारही या निमित्ताने समोर आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Ashok Kharat Case : अटकेच्या 72 तास आधी सिक्रेट मिटिंग! शिर्डीच्या हॉटेलमध्ये अशोक खरातला भेटलेले तीन IAS अधिकारी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल