छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांची 338 वी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची 338 वी जयंती असल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये गव्हापासून महाराजांची ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. ही प्रतिकृती बघण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जयंतीनिमित्त आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने अनोखा अभिवादन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या 338 व्या जयंतीनिमित्त 3 क्विंटल 68 किलो गव्हापासून महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती साकारली आहे. शहराच्या ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
advertisement
ही महाराजांची प्रतिकृती साकार करण्यासाठी तब्बल 12 तास एवढा कालावधी हा लागला आहे. उद्देश पगळे या कलाकाराने ही प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकार करण्यासाठी गहू लागलेले आहेत ते गहूनंतर जे पशु-पक्षी आहेत त्यांच्यासाठी खाद्य म्हणून वापरण्यात येणार आहे.
जे गोरगरीब लोक आहेत त्यांना देखील हे गहू देण्यात येणार आहेत. म्हणजेच की याची कुठल्याही प्रकारे नासाडी होणार नाही किंवा हे जे गहू आहेत ते वाया जाणार नाहीत, असं आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी सांगितलेले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी ही अशी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे.