खंडोबा यात्रेतील दागिने चोरीच्या प्रकारात सातारा पोलिसांनी सासू आणि सुनेला अटक केली. सीमा काळे आणि कविता काळे अशी या सासू–सुनेच्या जोडीची नावे आहेत. मात्र पोलिसांच्या हातात येण्यापूर्वीच दोघींनी चोरलेले सर्व दागिने त्यांच्या टोळीच्या मदतीने पसार केल्याचे समोर आले आहे.
'तुझे लग्नच होऊ देणार नाही', तरुणीचं शिक्षण सुटलं, एकतर्फी प्रेमातून नको ते घडलं, संभाजीनगरची घटना
advertisement
खंडोबा मंदिर परिसरात यात्रेमुळे हजारो भाविकांची गर्दी झाली होती. 30 नोव्हेंबरची सुट्टी असल्याने सकाळपासूनच विविध जिल्ह्यांतून भाविकांची मोठी वर्दळ होती. याआधीच काही महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्याने पोलिसांनी सतर्कता वाढवली होती. तरीही महिला चोरट्यांच्या टोळीने पोलिसांना चकवा देत दुपारी 2 ते 5 या तीन तासांत सलग चोरी केली. यात अंदाजे 4 ते 5 तोळ्यांचे दागिने लंपास झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले.
गर्दीत गोंधळ उडाल्यानंतर नागरिकांच्या मदतीने सीमा आणि कविता काळे या दोघींना पकडण्यात पोलिसांना यश आले. दोघी मुकुंदवाडी परिसरात राहतात. विशेष म्हणजे, सीमा ही 9 महिन्यांची गर्भवती असल्याने पोलिसांनी तिला नोटिशीवर सोडल्याचे सांगितले. तर कविता काळे हिला आधीही यात्रेत संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पीडित दुर्गा शर्मा यांच्या तक्रारीवरून आठ ते नऊ महिलांच्या सोनसाखळी चोरीप्रकरणी एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






