गंगापूरमधील वैरागडचे भाऊसाहेब शेजवळ हे दूध उत्पादक शेतकरी होते. त्यांची मुलगी शिवानी ही अकरावीत शिक्षण घेते. गुरुवारी सकाळी दूध घालून नेहमीप्रमाणे ते लेकीला क्लासला सोडायला निघाले होते. हनुमान जयंती असल्याने वाटेत हनुमान मंदिरात दर्शन घेतले आणि दुचाकीवरून ते लासूर स्टेशनकडे निघाले. बुधवारच्या अवकाळी पावसामुळे गाडीच्या चाकात चिखल अडकला. तो काढण्यासाठी ते रस्त्याच्या कडेला थांबले होते. तेव्हाच भयंकर घडले.
advertisement
आनंदाने आठवडी बाजाराला निघालं कुटुंब, वाटेत नियतीचा क्रूर घाव, बाप-लेकाचा जागीच मृत्यू
या भागात पुलाचे काम सुरू असून अचानक सिमेंट मिक्सर मशीनच्या चालकाने वाहन वेगाने रिव्हर्स घेतले. तेव्हा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या भाऊसाहेब यांना गाडीसह 50 फूट ओढत नेले. धक्कादायक बाब म्हणजे मिक्सर चालकाने कानात हेडफोन घातला होता. त्यामुळे त्याला बाप-लेकीच्या ओरडण्याचा आवाज आला नाही. यामध्ये चाकाखाली चिरडल्याने भाऊसाहेब यांचा जागीच मृत्यू झाला. तर अकरावीत शिकणारी शिवानी गंभीर जखमी झाली.
ग्रामस्थांचा संताप
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची पाहणी केली असता या ठिकाणी सिमेंट मिक्सर मशीनला आरसा नव्हता. बेजबाबदार चालकामुळे कुटुंबाचा आधार हिरावला गेला. त्यामुळे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतला होता. या घटनेनं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
