TRENDING:

मोफत साडीचं आमिष, हातात कुरकुरे दिले अन्..., वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं, संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: पद्मा यांना त्या ठिकाणाकडे घेऊन जाण्याचा बहाणा केला आणि ते अचानक पसार झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: गरीब महिलांना साड्या वाटप सुरू आहे, असं सांगत एका वृद्ध महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन ठगांनी वृद्ध महिलेला लुटलं. यामध्ये 48 वर्षांपूर्वी त्यांना आईने लग्नात दिलेले एक तोळ्याचे कानातले व पोत चोरट्यांनी लंपास केली. आईची शेवटची आठवण हिरावल्यानंतर संबंधित वृद्धेनं सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मोफत साडीचं आमिष, हातात कुरकुरे दिले अन्..., वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं, संभाजीनगरात खळबळ
मोफत साडीचं आमिष, हातात कुरकुरे दिले अन्..., वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं, संभाजीनगरात खळबळ
advertisement

संभाजीनगरमधील अंगुरीबाग परिसरात 65 वर्षीय पद्मा आरगी राहतात. 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्या भांडीकाम करण्यासाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडल्या. त्या गुलमंडी परिसरातून पायी जात होत्या. तेव्हा अज्ञात दोघांनी त्यांना आवाज देऊन थांबवले.

गरीब महिलांना साडी वाटप

“जवळच गरीब महिलांना साडी वाटप सुरू आहे. पण तुम्हाला अंगावरचे दागिने पाहून साडी देणार नाहीत,” असे त्यांनी पद्मा यांना सांगितले. तसेच त्यांच्याकडचे सोन्याचे 5 ग्रॅमचे कानातले झुमके व गळ्यातील 5 ग्रॅमची पोत काढून ठेवण्यास सांगितली. पद्मा यांनीही ते काढून रुमालात ठेवले आणि त्यानंतर त्यांना खाण्यासाठी कुरकुरेचे पाकीट दिले. तसेच रुमालातील दागिने चोरीला जातील सांगत त्यांच्याकडे घेतले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुलरची गार हवा तुमच्या जीवावर बेतू शकते! अशी चूक करू नका!
सर्व पहा

पद्मा यांना साडी वाटप होणाऱ्या ठिकाणाकडे घेऊन जाण्याचा बहाणा केला आणि ते अचानक पसार झाले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सुधाकर मिसाळ अधिक तपास करीत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मोफत साडीचं आमिष, हातात कुरकुरे दिले अन्..., वृद्ध महिलेसोबत भयंकर घडलं, संभाजीनगरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल