TRENDING:

Sambhajinagar : 'ऑनर किलिंग'च्या घटनेने संभाजीनगर हादरलं! आई 10 तास लेकीच्या बॉडीसमोर बसली अन् पोलिसांनी सापळा रचून पकडलं

Last Updated:

Sambhajinagar Nandini Dhiware Murder Case : मुलीच्या डोळ्यात अश्रू दिसले नाहीत. मुलीचा हा 'ढिम्मपणा' आईच्या मनात सलत होता आणि त्यातूनच स्वतः मरण्याऐवजी मुलीलाच संपवण्याचा टोकाचा निर्णय भारतीने घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात माणुसकीला काळिमा फासणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. ज्या मातेने जन्म दिला, त्याच आईने पोटच्या 21 वर्षीय मुलीचा रबरी पाईपने गळा आवळून निर्घृण खून केला. प्रेमप्रकरणाच्या वादातून घडलेल्या या 'ऑनर किलिंग'ने संपूर्ण जिल्हा हादरला असून, हत्येनंतरचा घटनाक्रम तर अधिकच भयाण आहे. नंदिनी धिवरे या तरुणीचे कन्नडमधील एका तरुणावर प्रेम होते आणि ती त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरून बसली होती.
Sambhajinagar Nandini Dhiware Murder Case
Sambhajinagar Nandini Dhiware Murder Case
advertisement

भारतीने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण....

आई भारती साबळे यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता, कारण नंदिनीचे पहिले लग्न आधीच मोडले होते. याच वादातून दोन दिवसांपूर्वी भारतीने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण मुलीच्या डोळ्यात अश्रू दिसले नाहीत. मुलीचा हा 'ढिम्मपणा' आईच्या मनात सलत होता आणि त्यातूनच स्वतः मरण्याऐवजी मुलीलाच संपवण्याचा टोकाचा निर्णय भारतीने घेतला.

advertisement

रबरी पाईपने तिचा गळा आवळला

गुरुवारी दुपारी 12 वाजता नंदिनी आंघोळीसाठी गेली असताना आईने संतापाच्या भरात रबरी पाईपने तिचा गळा आवळला. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर तब्बल 10 तास भारती आपल्या पोटच्या लेकीच्या मृतदेहासोबत घरातच बसून होती. सुरुवातीला ती पोलिसांत हजर होणार होती, मात्र पती उमेश साबळे आणि भाऊ अमोल गायकवाड यांनी तिला रोखले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला.

advertisement

'तू दुसरा नवरा केला, मी का नको', म्हणताच आईनं मुलीचा आवळला गळा, संभाजीनगरमधील घटनेचं गूढ उलगडलं!

मृतदेह जुन्या गादीत गुंडाळला आणि...

पुरावा नष्ट करण्यासाठी या तिघांनी मिळून नंदिनीचा मृतदेह एका जुन्या गादीत गुंडाळला आणि दोरीने घट्ट बांधला. घरगुती सामान हलवत असल्याचा बनाव करून हा मृतदेह रिक्षातून कन्नड येथील शेतात नेऊन गुपचूप पुरण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते; रिक्षाने जात असतानाच पोलिसांना या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला.

advertisement

पोलिसांनी बेड्या ठोकल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

दरम्यान, तीसगाव चौफुली पुलाजवळ पोलिसांनी रिक्षा अडवली आणि गादीत गुंडाळलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावून गेले. याप्रकरणी आई भारती, सावत्र वडील उमेश आणि मामा अमोल या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका हट्टी प्रेमापायी एका तरुणीचा जीव गेला, तर रागाच्या भरात एका आईने स्वतःच्या हाताने आपलं हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar : 'ऑनर किलिंग'च्या घटनेने संभाजीनगर हादरलं! आई 10 तास लेकीच्या बॉडीसमोर बसली अन् पोलिसांनी सापळा रचून पकडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल