सोशल मीडियावरून सुरू झाला भयंकर कट
या प्रकरणात 16 वर्षीय पीडित मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी पीडितेची आरोपी शाहरुक पठाण याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मोबाईलवर संभाषणात रूपांतर झाले. दरम्यान आरोपीने पीडितेकडे लग्नाची मागणी घातली होती; मात्र पीडितेने तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला होता.
advertisement
दरम्यान1 जानेवारी रोजी सकाळी पीडिता ही तिच्या आईसोबत शाळेत गेली होती. आई शाळेतून निघून गेल्यानंतर काही वेळातच आरोपी तेथे आला. लग्नाबाबत पुन्हा बोलायचे असल्याचे कारण सांगत त्याने पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला शेंद्रा परिसरातील वरुड काझी गावाजवळील एका कांद्याच्या गोडाऊनमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
घटनेनंतर पीडिता रडत असताना तेथील स्थानिक नागरिकांनी तिचा आवाज ऐकून धाव घेतली आणि तिला मदत केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
