‘जीएसटी’त दिलासा नाही
नुकतेच जीएसटी सुधारणा लागू झाल्या असून स्वयंपाक घरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत दर कमी झाले आहेत. या सुधारणांत ट्रॅव्हल्स प्रवासासाठी ‘जीएसटी’ची सवलत मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तिकीट बुकिंगवर 5 टक्के जीएसटी कायम आहे. त्यामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री कायम आहे.
ऑनलाईन बुकिंग प्रणालीत तिप्पट दर
ट्रॅव्हल्स असोसिएशनने भाडेवाढीचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये दिवाळीच्या काळातील तिकीट दर दुपटीने, तिपटीने वाढण्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाण्यासाठी सध्या 550 रुपये मोजावे लागतात. याच ठिकाणी दिवाळीत 1550 रुपयांपर्यंत मोजावे लागतील. पुण्यासाठी सध्या 581 तर दिवाळीत 1510 रुपये भाडे दिसत आहे. मुंबईला सध्या 800 तर दिवाळीच्या काळात 2500 रुपये मोजावे लागतील. नागपूरसाठी आता 1230 आणि दिवाळीत तब्बल 4 हजार रुपये तिकीट दर दिसत आहेत.
advertisement
नियम काय?
नियमानुसार ट्रॅव्हल्सचालकांना ‘एसटी’ बसच्या तुलनेत दीडपट भाडे घेता येते. अधिक भाडे आकारल्यास प्रवासी तक्रार करू शकतात. तशी तक्रार आल्यास संबंदित ट्रॅव्हल्स मालकांवर आरटीओकडून कारवाई केली जाते. तर अनेक मार्गांवर ट्रॅव्हल्सचे भाडे हे एसटीपेक्षा कमी असल्याचाच दावा केला जातो.