प्रा. पवार हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या विद्यालयाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र, नक्षत्रवाडी परिसरात समोरून वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पवार गंभीर जखमी झाले, तर समोरील दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना खासगी रुग्णालयात नेले; पण अखेरचा श्वास वाचवता आला नाही.
advertisement
पवार यांच्या निधनाने घरातील आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्याप शिक्षण घेत असलेल्या मुलांचे कर्ते वडील आता नसल्याने घरात शोककळा पसरली आहे. मुलांसाठी तेच धैर्य, तर पत्नी आणि वृद्ध आई-वडिलांसाठी तेच जगण्याचा आधार होते. एका क्षणिक अपघातात कुटुंबाचा कणा तुटल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. शांत, नम्र, विद्यार्थ्यांचा आवडता आणि अध्यापनात सदैव मनापासून कार्यरत असलेले प्रा. हेमंत पवार यांच्या जाण्याने विद्यालयातील सहकारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
