याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारशिवमध्ये नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रेम शिंदे हा विद्यार्थी शिकत होता. दहावीत शिकणाऱ्या प्रेमने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
advertisement
प्रेमच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी शंका व्यक्त केलीय. मुलाला मारहाण करून त्याला लटकावलं असल्याचा आरोप प्रेमच्या वडिलांनी केलाय. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याबाबत आता संशय बळावलाय. ढोकी पोलिसांनी काका महाराज उमरे यांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे पण गुन्हा दाखल केलेला नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 06, 2023 12:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
धाराशिवमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, वडिलांनी व्यक्त केली घातपाताची शंका
