क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपीचं राक्षसी कृत्य; आधी पेट्रोलचं इंजेक्शन दिलं अन् नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये..
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयातून चिमुकल्यांना भयानक शिक्षा देण्यात आली आहे.
सिद्धार्थनगर, 6 जुलै : उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सिद्धार्थनगरच्या पथरा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन मुलं घुसली होती. या मुलांना काही लोकांनी पकडलं. त्यानंतर या मुलांना चोर असल्याच्या संशयातून भयानक शिक्षा देण्यात आली आहे. मुलांना आधी पेट्रोलचं इंजेक्शन देण्यात आलं, त्यानंतर त्यांना मानवी मुत्र पेऊ घातलं. इतकचं नाही तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची घालण्यात आली. या सर्व घटनेचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पीडित मुलं अवघ्या सहा ते सात वर्षांचे आहेत.
चोरीचा संशय
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्री फार्ममधून दोन हजार रुपयांची चोरी झाली होती. या मुलांनीच चोरी केली असा संशय आरोपींना होता. त्यांनी मानसिकरित्या दुर्बल असलेल्या या मुलांना आपल्या दुकानावर चहा पिण्याच्या निमित्तानं बोलावून घेतलं. त्यानंतर आरोपीने आपल्या काही साथिदारांच्या मदतीनं या मुलांना ही भयानक शिक्षा दिली आहे. आरोपींनी या प्रकरणाचा एक व्हिडीओ बनवला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सहा लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
advertisement
गुन्हा दाखल
या प्रकरणात पीडित मुलांच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार विविध कलामान्वये पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मोहम्मद आकिब, अब्दुल सऊद, रफीउल्लाह, शेरअली आणि दीपक या आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी सऊद आणि शप्पू हे फरार आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
August 06, 2023 10:07 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपीचं राक्षसी कृत्य; आधी पेट्रोलचं इंजेक्शन दिलं अन् नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये..