'सर सुखाची' ने ट्रेंड सेट केला, तब्बल 13 वर्षांनी अभिजीत सावंतचं मराठी सिनेमासाठी गाणं, तुम्ही ऐकलं का!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Abhijeet Sawant New Marathi Song : इंडियन आयडियल 1 विजेता अभिजीत सावंतने 13 वर्षांनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. "सर सुखाची श्रावणी" नंतर त्याने पुन्हा मराठी प्रेक्षकांना वेड लावण्याची तो सज्ज झाला आहे.
इंडियन आयडियल 1 चा विजेता, बिग बॉस मराठी 5 चा रनर अप आणि लाखो मुलींची धडकन अभिजीत सावंत. हिंदीत मोहबते लुटाऊंगा तर मराठीत सर सुखाची श्रावणी या दोन्ही गाण्यांनी अभिजीतने प्रेक्षकांना वेड लावलं. त्याने आतापर्यंत अनेक गाणी गायली पण या दोन गाण्यांसाठी अभिजीतची वेगळीच फॅन फॉलोविंग आहे. मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातील 'सर सुखाची' हे गाणं अभिजीत सावंतने गायलं आणि एक ट्रेंड सेट केला. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आहे.
'सर सुखाची' या गाण्यानंतर अभिजीत सावंतने कोणत्याच मराठी सिनेमासाठी गाणं गायलं नाही. इतका चांगला गायक आजवर कुठे होता असा प्रश्न अनेकांना पडला होता. सर सुखाची या गाण्यानंतर तब्बल 13 वर्षांनी अभिजीत सावंतने मराठी सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड केलं आहे.
advertisement
2025 वर्षात ट्रेंड सेटर ठरलेला गायक अभिजीत सावंत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सुरले अंदाजात मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळणार आहे. अगदी इंडियन आयडॉल ते ट्रेंड सेटर गायक म्हणून असलेली त्याची ओळख कायम प्रेक्षकांना काहीतरी नवीन गाणं देऊन जाते.
तब्बल 13 वर्षानी पुन्हा एकदा अभिजीत " सखे गं साजणी " या मराठी चित्रपटाच टायटल ट्रॅक त्याने केलं आहे. सर सुखाची श्रावणी या सदाबहार गाण्यानंतर तो आता पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या गाण्यात अभिजीतची एक झलक देखील बघायला मिळतेय.
advertisement
सखे गं साजणी हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. गाण्याविषयी बोलताना अभिजीत सावंत म्हणाला, "चित्रपटासाठी गाणं करणं हे प्रत्येक गायकांच स्वप्नं असतं आणि अश्यातच ही संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. "सखे गं साजणी" चित्रपटाचं टायटल ट्रॅक करायचं आहे हे समजलं तेव्हा पासून या गाण्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता होती. गाणं गाऊन अभिनय करणं या दोन्ही गोष्टी या गाण्यात करायला मिळाल्या आहेत त्यामुळे हे गाणं अजून खास झालं आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम दिलं तेवढंच प्रेम प्रेक्षक या गाण्यासाठी देखील देतील अशी आशा आहे"
advertisement
याआधी अभिजीतची "चाल तुरू तुरू , रुपेरी वाळूत ही मराठी गाणी रिलीज झाली आहेत. गाण्यांमधून अभिजीतच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवली आहे आता या नव्या गाण्याने देखील प्रेक्षक पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 5:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'सर सुखाची' ने ट्रेंड सेट केला, तब्बल 13 वर्षांनी अभिजीत सावंतचं मराठी सिनेमासाठी गाणं, तुम्ही ऐकलं का!









